Experience about the social service activity in Adhar Deaf and Dumb school,Bibvewadi Pune.
दिनांक 5 जानेवारी 2020 या दिवशी बीएडच्या विद्यार्थी शिक्षकांना घेऊन बिबबेवाडी , पुणे येथील आधार मुक-बधिर विद्यालयांमध्ये समाजसेवेच्या कामासंदर्भामध्ये जाण्याचा योग आला , गेलो खरं तिथं पण आलेले अनुभव आणि मूकबधिर विद्यार्थ्यांची बोलण्याची सवय काही क्षणातच आम्हालाही लागू झाली आणि आम्ही एका नवीन विश्वात आलो आहोत याचं भानही तत्काल झालं. मग काय शब्दाविना समजण्याचा प्रवास सुरू झाला. एक नाही ,दोन नाही ,तर तब्बल चार तास तिथे घालवले आणि एक अद्भुत,विलक्षण अनुभव मिळाला. पहिला भाग असा होता मुलं शब्दाच्या भाषेऐवजी, संकेताच्या भाषेमध्ये अधिक समजत होती हे पाहून आम्ही आमच्या पद्धतीने ते वापरायला सुरुवात केली. तिथे मुलांच्या शिक्षिका होत्या, सौ. पूर्वा मॅडम त्या खूपच अचूक हातवारे, अचूक संकेत करत आणि मुले ते पटापट आत्मसात करतआणि त्याची लगेच अंमलबजावणी करत.
अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील माझ्या गटातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी काही उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने आम्ही श्री. घाडगे सर व सौ. पूर्वा मॅडम या शिक्षकांच्या मदतीने लगेच त्यांना गटांमध्ये बसवून घेतले ,पाहता-पाहता गटांमध्ये मुलं बसूनही गेली शैक्षणिक साहित्य त्यांना वाटून दिले आणि बरोबर सुरु झाला चित्र रंगवण्याचा एक उपक्रम ! त्यानंतर आम्ही त्यांना फुगे दिले मुलांनी फुग्यांमध्ये हवा भरली आणि त्या फुग्यांवर स्वतःचे नावही लिहिले.आमच्या विद्यार्थी-शिक्षकांनी गटामध्ये बसून त्यांना चित्रांमध्ये रंग भरण्यास विशिष्ट वेळ दिला ठराविक वेळेमध्ये मुलांनी भराभर चित्र रंगवली आणि त्यातून त्यांना खूपच आनंद मिळाला. सदर अँक्टिविटी संपल्यानंतर लगेचच आम्ही त्यांना दुसरी अँक्टिविटी करायला दिली , वर्तमानपत्रापासून वेगवेगळे विनोदी पोशाख तयार करून ते आपल्यातील एका मित्राला लगेचच त्या पेहरावात सजविणे.मग काय भन्नाट कल्पना सुरू झाल्या कोणी राजाच्या, कोणी महाराजाच्या, कोणी जोकर, तर कोणी चक्क हनुमानाच्या ,कोणी बाहुबलीच्या, नाना तऱ्हेच्या कल्पना करत मुलं अगदी रमून गेली (त्याचे काही फोटो या ब्लॉगमध्ये शेअर करतच आहे )ते तुम्ही पाहून त्यांच्या कल्पनेतला आनंद घेऊ शकता आम्हाला त्यांनी केलेल्या कामाचा तपशील त्यांच्यासमोरच मांडायचा होता मला त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थी शिक्षकांनी निरीक्षण करायचं काम दिलं होतं मी ते चोखपणे बजावले पण सर्वांनी इतक्या व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक काम, प्रत्येक उपक्रम, इतका छान केला होता की मला त्यातून कोणतं चांगलं आणि कोणतं कमी दर्जाचं असं म्हणण्याला वावच राहिला नाही.
परंतु औपचारीकतेचा एक भाग म्हणून आम्ही त्यातील काही विद्यार्थ्यांना काही बक्षीस दिली त्याप्रमाणे आम्ही उपस्थित सर्व मुलांना कॅडबरी चॉकलेट दिले त्यांच्यातील काही विद्यार्थ्यांना आमचा हा उपक्रम कसा वाटला याबद्दल त्या मुलांनी बोलावे अशी विनंती आम्ही पूर्वा मॅडमना केली आणि त्यांनी काही मुलांना प्रोत्साहन दिले एक दोन मुलांनी येऊन आपले विचार व्यक्त केले आणि मग काय लागली इतर मुलेही भराभर बोलायला ! मुलं स्वतः येत व आपले मनोगत व्यक्त करत. येथेही फक्त आणि फक्त संकेत आम्ही पुरते गोंधळून गेलो पूर्वा मॅडम यांचा नेमका अर्थ शब्दात सांगायच्याआणि आम्ही सुखावून जायचो त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि प्रत्येक विद्यार्थी घेऊन आपले मत मांडू लागला एका विद्यार्थ्यांनी येऊन असा प्रश्न विचारला की,तुम्हाला आमच्या शाळेचा पत्ता कुणी दिला ? मग मात्र आम्ही हरखून गेलो,अरे काय,किती विलक्षण बुद्धिमत्ता असलेली मुले आहेत ! यानंतर मग एका मुलाने यांना आपला पत्ता "गुगल"वर मिळाला असेल ! असे सांगितले मग मात्र एकच हशा पिकला आणि सगळे त्याच्याकडेच एकटक नजरेने पाहू लागले, त्यानंतर थोडेसे फोटोसेशन झाले मुलं थोडासा विरंगुळा म्हणून फुग्यांमध्ये हवा भरलेली असताना त्यावर नाव टाकलेले असताना एकमेकांचे भरलेले फुगे फोडण्यात मग्न झाले त्यांनी पेपर जमा करून शैक्षणिक साहित्यही आम्हाला माघारी दिले त्यानंतर आमच्या विद्यार्थी -शिक्षकांनी शाळेला काही ठराविक रक्कम भेट म्हणून दिली. लगेचच पूर्वा मॅडमनी हे कोण आहेत ? असे खुणावत माझ्याकडे बोट दाखवले !तेव्हा मुलांनी हे त्यांचे सर आहेत असे सांगितल्यानंतर मी एकदम अचंबित झालो. B.Ed कॉलेजमध्ये विशेष विद्यार्थी हा शब्दप्रयोग माझ्याकडून वारंवार झाला होता आणि आज त्याची प्रचिती आल्यामुळे मी इतका सुखावून गेलो की त्या दिवशीआलेला अनुभव आणि त्यातून मिळालेला आनंद हा शब्दातीत होता हे मात्र नक्की ! मी माझ्या बीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शेवटी काही गोष्टी सांगितल्या या आजच्या उपक्रमामधून तुम्ही हे नक्की शिकला असाल की प्रत्येक व्यक्ती ही विलक्षण आणि वेगळी असते विचित्र नाही.
समावेशक शिक्षण याअंतर्गत हा मुक-बधीर विद्यार्थी येतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या वर्गामध्ये विशेष विद्यार्थी आढळून आला तर अशा शाळेचा संपर्क नंबर व पत्ता तुमच्याजवळ बाळगा आणि समाजातील अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आधार मुक-बधीर विद्यालयासारख्या संस्थांना सहकार्य करण्यास विसरू नका या उपक्रमाचे संयोजन विद्यार्थी शिक्षक श्री चिराग हसिजा यांनी गटातील सर्वच विद्यार्थी -शिक्षकांच्या मदतीने केले या उपक्रमास मार्गदर्शन डॉ.अमोल चव्हाण यांनी केले तर 111B कोर्स चे समन्वयक प्राध्यापक श्री किरण ननवरे सरांनी उद्बोधन केले आणि समाजसेवा हा कोर्स कसा पूर्ण करावा यासाठी डॉ. कांचन चौधरी प्राचार्य अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी मार्गदर्शन केले व विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ. अरूणा निकम यांनी भेटीसाठी परवानगी दिली त्यामुळे आम्ही सर्वांनी या सर्व क्षणाचा आनंद व अनुभव घेतला शेवटी कोर्समध्ये केलेल्या कामाची यादी व राहिलेल्या कामाचा आढावा घेतला आणि लगेच मी उपस्थित सर्व विद्यार्थीं-शिक्षकांना उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी करण्यास सांगितले तत्काळ आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
शब्दांकन : डॉ.अमोल शिवाजी चव्हाण
सहाय्यक प्राध्यापक
अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालय(बी.एड)
आंबेगाव बुद्रुक पुणे 46
Please like, comment and share this post.
Welcome your feedback also.
Please see some selected pics... Hope that you will joy with...

Very nice
ReplyDelete