Gist Of Orientation on Entrepreneurship...


Gist Of Orientation on Entrepreneurship... 
                 नमस्कार ,आज आपण उद्यमशीलता या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय बीएड कोर्स 212  उद्यमशीलता व ओपन कोर्स याअंतर्गत विद्यापीठात कडून भरपूर प्रात्यक्षिक कार्य व  माहिती पुरविण्यात आलेली आहे. मला प्रारंभी आपणास प्रश्न विचारावसा वाटतो की, उद्यमशीलतेची  शिक्षकाला आवश्यकता आहे ? कोण उत्तर देईल ! थोडक्यात सांगायचं म्हणजे एकविसाव्या शतकात जगत असताना मनुष्य प्राण्यांच्या गरजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्याच्या वाढत जाणाऱ्या गरजा यामध्ये अन्न, वस्त्र निवारा, आरोग्य ,शिक्षण ,संभाषण ,प्रवास आदींची यादी जोडायला हरकत नाही या इतक्या गरजा त्यात भारतासारखा लोकसंख्येमध्ये अग्रगण्य असणारा देश आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या गरजा आणि याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारी संसाधन यामध्ये तफावत निर्माण झाल्याने काहीतरी दुय्यम व्यवसाय फुरसतिच्या वेळेत करून आपली गरज पूर्ण करण्यासाठी उद्यमशीलता या विषयाची गरज आहे. अजून वेगळे उदाहरण घ्यायचे झाले तर प्राथमिक शिक्षणाची गरज ओळखून एक शिक्षक  स्वतःचा कोचिंग क्लास सुरू करून तो व्यवस्थितरित्या चालवू शकतो ; तसेच शिक्षण संस्था स्थापन करून स्वतःचा व समाजाचा विकास  साधू  शकतो. 
                यानंतर आपण दुसरे उदाहरण 21 व्या शतकामध्ये जगत असताना आपल्याला एका कौशल्यावर जीवनाची नौका पैलतीरावर नेणे कठीण आहे मग आपण एखाद्या नवीन  व्यवसायाकडे वळून पाहतो आपल्या कामाच्या वेळा सांभाळून कोणता व्यवसाय वा उद्योग जो आपल्याला ओळख आणि पैसा आणि उपलब्ध करून देऊ शकेल याची चाचपणी  करून  झाल्यावर  मग विचार सुरू होतो की, मी जे शिकलो किंवा मी जे शिकले  त्याची गरज आहे समाजात कुठे आहे ? मला जर व्यवहार व व्यापार उपयोगी असं शिक्षण आणि कौशल्य मला माझ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळालं असतं तर मला फक्त एकाच गोष्टीवर थांबून न राहता मी बहुकौशल्यानी  युक्त असा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष  बीएड 212 या अभ्यासक्रमांतर्गत उद्योगशीलते बद्दल अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, याचा विद्यार्थी शिक्षकांनी  अभ्यास करून स्वतःला आवडत असलेला एखादा छोटासा व्यवसाय त्या व्यवसायास आवश्यक असणारे कौशल्य त्या व्यवसायात यशस्वी  झालेले उद्योगपती त्या उद्योगपतीने सुरू केलेला एखादा प्लांट या गोष्टींचा प्राध्यापकाच्या मदतीने इत्यंभूत अभ्यास करून आपल्या अंगी काही कौशल्य रुजविण्याचा आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा एखादा छोटासा लघुउद्योग स्थापन करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे.भारतीय शिक्षणाचा  मुख्य उद्देश स्वावलंबी शिक्षण हा पूर्णत्वास  न्यायचा असेल तर उद्योग विषयक बाबींचा विचार करायला हवा. 
                उदाहरणार्थ संगणकाच्या माध्यमांमधून एका शिक्षकाला अल्प वेळेमध्ये कोणते उद्योग सुरू करता येऊ शकतात क्रमांक एक : अभ्यास सामुग्री विकसित करता येते , दोन: पुस्तके तयार करता येतात, तीन: मासिकांमध्ये लेख लिहिता येतात , आपली वेबसाईट सुरु करता येते ,स्वतःच्या अध्ययन अध्यापनाचे सर्व साहित्य अपलोड करता येते स्वतः जे लेखन आहे ते लेखन इंटरनेटवर आणि व नियतकालिकांना पाठवता येऊ शकते तसेच काही उपक्रम केलेले असल्यास त्यांना उपक्रमाचा व्हिडिओ तयार करून तो युट्युब सारख्या चैनल वर अपलोड करता येते. या व्हिडीओ मुळे आपली सृजनशीलता जगासमोर येते. अध्ययन अध्यापनासाठीच्या नोट्सचा संग्रह करून त्याची विक्री ही करता येते.एकदा मी असाच स्वयंरोजगार केंद्रामध्ये माझ्या नावाची नोंदणी करायला गेलो ,मला नेहमी भिंतीवरील सुविचार  वाचायला आवडत असल्यामुळे आपसूकच माझी नजर त्या भिंतींवर गेली " उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी " याचा अर्थ माझ्या सहकारी मित्र आणि ज्येष्ठ माणसांना विचारला त्यांनी मला सांगितले, स्वतःचा उद्योग,व्यवसाय सुरू केल्यामुळे जीवनामध्ये समृद्धी येते ,स्वतःचा नावाचा  लौकिक  पसरतो आणि तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठेचा ही लाभ होऊन तुम्ही देशाच्या विकासास साहाय्यभूत ठरता, हे महत्त्वाचे आहे. या 212 अंतर्गत एकूण 2 प्रात्यक्षिक कार्याचा समावेश आहे त्यात क्र 1 हे एक उत्पादन निर्माण करणे हे असून यात brochre ची निर्मिती करण्यात संदर्भात मी एक word file आपल्याला दिली आहे त्याचा आधारे आपण उत्पादन तयार करून त्याचा निर्मितीचा प्रात्यक्षिक अहवाल निकषांवर आधारित लिहिणे अपेक्षित आहे तसेच प्रात्याक्षिक क्र 2 मध्ये 5 पैकी 1 विषयावर आधारित प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करायचे आहे आपण चर्चेसाठी क्र 5 :एका उद्योगपतीची मुलाखत घेऊन ती निकषांवर आधारित लिहून एका journel वा file मध्ये क्रमाने लिहून सादर करावयाचे आहे, प्रस्तुत 212 हा विषय एकूण 50 गुणास आहे.
 

 धन्यवाद !

शब्दांकन: डॉ अमोल चव्हाण

Comments

Popular Posts