Philip Jackson model for Teaching : Role of teachers
अभिनव एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय अभिनव शिक्षण शास्त्र महाविद्यालय व प्लॅनिंग कमिटी व स्कॉलर रिसर्च इंटरनॅशनल जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 11 व 12 ऑक्टोबर 2014
उपविषय : प्रगत शैक्षणिक अध्यापनशास्त्र
फिलीप जॅक्सन प्रति मनातील अध्यापनाच्या तीन अवस्था व व शिक्षकाची प्रत्येक अवस्था मध्ये असणारी भूमिका
आलेख प्रस्तुता : श्री अमोल शिवाजी चव्हाण
गोषवारा
प्रगत अध्यापन शास्त्र मध्ये दररोज नवनवीन परिवर्तन होताना दिसून येत आहेत फिलीप जॅक्सन या शिक्षण तज्ञाने अध्यापन प्रतिमान आतून या तीन अवस्थांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे या 3 अवस्था संदर्भात आपले विचार विषद केले आहेत परंतु त्या तीन अवस्थांच्या बाबतीत नवोदित विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या भूमिका सुस्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याने प्रस्तुत आलेखामधून आलेख प्रस्तुयांनी प्रत्येक अवस्थेमध्ये नवोदीत शिक्षकाच्या भूमिकेचे वर्णन प्रस्तुत लेखांमधुन केलेले आहे केलेले आहे.
महत्वपूर्ण शब्द: तंत्र, क्रियात्मक ,मूल्यमापन, उद्दीपक, कार्यनीति, दृढीकारक
विषय:
फिलीप जॅक्सन प्रति मनातील अध्यापनाच्या तीन अवस्था व व शिक्षकाची प्रत्येक अवस्था मध्ये असणारी भूमिका
अ. प्रस्तावना
फिलीप जॅक्सन यांनी आपल्या लाइफ इं क्लासरूम या पुस्तकांमध्ये अध्यापन अवस्थान विषयीची विस्ताराने मांडणी केलेली आहेत या पुस्तकामध्ये ज्या क्षणी अध्यापनाच्या तीन अवस्थांचा विस्तृत विचार मांडलेला आहे अध्यापनाच्या एकूण तीन अवस्था त्यांनी सांगितलेले आहेत
आ. अध्यापन अवस्था:-
१.प्रथम अवस्था : अध्यापनाची पूर्व अवस्था
२.द्वितीया अवस्था :अध्यापनाची अंतर क्रियात्मक अवस्था
३.तृतीय अवस्था :अध्यापनाची उत्तर अवस्था
वरील अवस्थांचा विस्ताराने विचार भूमिकेसह करू .
१.प्रथम अवस्था : या अवस्थेमध्ये अध्यापन नियोजनाचा भाग येतो वर्गात प्रत्यक्षात या अध्यापनाला जाण्यापूर्वी शिक्षकाला अनेक बाबीं कराव्या लागतात, त्या पुढीलप्रमाणे उद्दिष्ट निश्चित करणे उद्दिष्ट लेखन करणे अशी यांची निवड करणे त्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त साधने व पद्धतीचा निर्णय घेणे असे प्रसिद्धीसाठी समर्पक व सुयोग्य युक्त या निश्चित करणे उद्दिष्टांच्या मूल्यमापनासाठी मापन सादे व तंत्रे निश्चित करणे वरील बाबींचा सूक्ष्मपणे अभ्यास व विचार करणे आवश्यक आहे
२. द्वितीया अवस्था: या अवस्थेत विविध महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास विचार करणे गरजेचे आहे ,
त्यामध्ये
१.प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेणे.
२.अध्यापन करण्यासंबंधीचे निदान करणे
३. ज्ञान संपादनाची कृती करणे
प्रत्यक्षात यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात अ. उद्दीपक निवड करणे
आ. उद्दीपकांचे सादरीकरण
अ.यामध्ये उद्योजकांची समर्पकता ,अपेक्षित फलित ,उद्दीपक आशय अग्रसरणात उपयुक्त आदीं बाबींचा विचार झाला की उद्दीपक निश्चित होतो.
आ.उद्दीपक सादरीकरणाला उद्दीपक काही अनुकूल-प्रतिकूल प्रतिसाद मिळू शकतात तर शिक्षकांनी अनुकूल प्रतिसादास दृढीकरक दिल्याने त्यांचे दृढीकरक होईल तर प्रतिकूल प्रतिसादास कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्याने वर्तनाची क्षमता क्षीण होण्याची शक्यता बळावते , यातील शक्य -शक्यता पडताळणे,आदींसाठी शिक्षकांला शाब्दिक व अशाब्दिक अशा या दोन्ही मार्गांचा अवलंब करता येतो .
३.विद्यार्थी दृढीकरण कार्यनीतीचे विकसन करणे :-विद्यार्थ्यांची प्रेरणा टिकून रहावी , त्याचे वर्तन तर नियंत्रित असावेच परंतु काही कौशल्य, युक्त्यांचा प्रयोग करावा लागेल जेणेकरून आशय प्रभावीपणे पोहोचेल व वातावरण अध्ययनअध्यापनास पूरक असेल.
३. तृतीयावस्था : या अवस्थेमध्ये फिलीप जॅक्सन यांनी मूल्यमापन व त्या अनुषंगाने करावयाच्या कृतींचा समावेश केला आहे.
१. अपेक्षित वर्तन बदलाची दिशा निश्चित करणे. शिक्षणाचे उद्दिष्ट हे आवश्यक अध्ययन अनुभव देऊन अपेक्षित वर्तन बदल वर्तनाचा स्तर ठरवण्याचे आहे .
२. वर्तनाचे मापन करण्यासाठी समर्पक साधनांची निवड करणे.
३. प्राप्त प्रतिसादा नुसार अध्यापनाची दिशा बदलवायची किंवा नाही या संबंधीचा निर्णय घेणे. शिक्षकाचे अध्यापनानंतर विद्यार्थ्याना आशय कितपत समजला आहे ? आशयाचे ग्रहण व संपादन पक्के का कच्चे यामध्ये समजा फलप्राप्ती झाली नाही तर काय ? शिक्षकास अंतर निरीक्षण करावे लागेल की आपल्या अध्यापन पद्धती किंवा मूल्यमापन कशात त्रुटी आहेत ? या प्रश्नांच्या उकलन करण्यासाठी प्रयत्न करून अध्यापन कार्यनिती बदलावी लागेल जर सर्व बाबीं ठीक व वर्ग परिस्थिती व विद्यार्थी मानसिकता भिन्न असेल तर अभ्यास व चिंतन करून समर्पक निर्णय घ्यावा लागेल.
इ) सारांश :- अशाप्रकारे फिलीप जॅक्सन यांनी अध्यापनाच्या तीन अवस्थांमध्ये नियोजन ,आंतरक्रिया आणि मूल्यमापन या अवस्थान संदर्भात विविध बाबीं क्रिया ,उपघटकांचा
समावेश केला असून अध्यापनास एक अधयापनविषय शास्त्रीय व चिकित्सक दृष्टी देण्यास सहाय्यक असे प्रतिमान निर्माण केलेले आहे.
ई) अध्यापन अवस्थांमध्ये शिक्षकांची भूमिका:-
अध्यापनाच्या या ३ अवस्थांमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे त्याचे विवेचन पुढील प्रमाणे
१. अवस्था क्र :१
अवस्थेमध्ये फिलीप जॅक्सन प्रतिमानात "उद्दिष्टांची निश्चिती "करण्यास शिक्षकाची भूमिका सांगितलेली आहे परंतु नवोदित शिक्षकांनी प्रथम उद्दिष्ट निश्चिती चा विचार न करता पाठाचे नियोजन करण्याच्या गोष्टीचा विचार करणे करायला पाहिजे यामध्ये प्रथम नियोजन करण्यापूर्वी आपल्या अध्यापन पद्धतीचा कोणता आशय त्यासाठी आवश्यक असणारे पूर्वज्ञान, अध्यापन हेतु, पाठातून प्रतिबिंबित होणारी जीवन कौशल्ये,अध्यापनाचे सूत्र, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने या बाबींचा पूर्वतयारीमध्ये विचार करणे आवश्यक आहे
१.२ पूर्वतयारी नंतर नियोजनाच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे उद्दिष्टांची निश्चिती करण्याकडे शिक्षकांनी येणे अपेक्षित आहे यामध्ये संबंधित आशयाशी निगडित काही निरीक्षणक्षम उद्दिष्टांचे लेखन यामध्ये ज्ञान, आकलन ,कौशल्ये,या उद्दिष्टांचा विचार आवश्यक आहे ही तिन्ही उद्दिष्टे वर्तमान काळात एका विद्यार्थ्याला संबोधून, विशिष्ट विधानांमध्ये लिहिणे आवश्यक आहेत तर उर्वरीत ३ उद्दिष्टे, यात उपयोजन, अभिरुची आणि अभिवृत्ति या उद्दिष्टांचे निरीक्षण करू शकत नसल्याने या सर्व उद्दिष्टांचे नेमके, नेटके व काटेकोरपणे सुस्पष्ट शब्दात लेखन करावे.
१.३ उद्दिष्टांच्या निश्चिती नंतर शिक्षक कृतीमध्ये आशयातील महत्त्वाच्या बाबीं व अन्य महत्त्वपूर्ण संबोधाचे सादरीकरण करताना शैक्षणिक साधनांची निवड उपयुक्त ठरत असल्याने पारंपरिक व अत्याधुनिक संगणक आणि मोबाइल फोन यासारख्या शैक्षणिक साधनांचा विचार करणे आवश्यक आहे.
१.४ मूल्यमापन साधने व तंत्रे निश्चित करताना आशयाची निश्चिती केल्याप्रमाणे उद्दिष्ट तपासणीसाठी तंत्रांची निवड करने आवश्यक आहे यामध्ये विविध प्रश्न विचारे झाल्यानंतर तत्काल छोटीशी वस्तुनिष्ठ परीक्षासुद्धा उपयोगी ठरू शकते.
२. अवस्था २:-
२.१ नवशिक्या विद्यार्थी शिक्षकाने वर्गात प्रवेश करताच संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यावर नजरेचा एक कटाक्ष टिकणे अपेक्षित आहे त्यामुळे विद्यार्थ्याच्या वर्तनावर शिक्षकाचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा कमजोरपणा व नेमकेपणा ओळखता येतो जो अध्यापन कार्यनिती च्या वापराबद्दल एक अंदाज ठरविण्यास सहाय्यक ठरतो.
२.२ विद्यार्थी शिक्षकांमध्ये सौहार्दतेचे वातावरण असणे :-शिक्षक एक अनुभवी व्यक्ती म्हणून वर्तन ठेवत असेल तर विद्यार्थी अधिक निकोप संवाद साधेल असा निकोप संवाद निकोप वातावरणाची निर्मितीस आधारभूत असेल, जो शिकण्यास आणि शिकवण्यासाठी आवश्यक ठरेल.
२.३ विद्यार्थी -शिक्षक व विद्यार्थी -विद्यार्थी आणि शिक्षक -विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया ह्या ज्ञान संपादनास सहाय्य करत असतात, शंकांचे समाधान जर झाले तर विद्यार्थी संबंधित आशयाचे ज्ञान व आकलन झाल्यामुळे शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण होतील व शिक्षकांना तत्काळ प्रत्याभरण घेऊन अध्यापन कार्यनिती मध्ये आवश्यक ते बदल करता येऊ शकतात.
३. अवस्था ३:-
अवस्था ३ ही "मूल्यमापन" या दृष्टिकोनातून पाहते नवशिक्या किंवा अनुभवी शिक्षकांनी फक्त ३५ मिनिटाच्या मर्यादीत वेळेत आशयाचे मूल्यमापन करणे आवश्यक नसून तिथे विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे.
३.१ वर्तमान शिक्षण व्यवस्था ही सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनास अग्रस्थान देणारी असून प्रमाणभूत मानणारी आहे शिक्षकांनी व विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनाच्या नोंदीचे अचूक लेखन करणे अत्यावश्यक आहे.
३.२ मापनासाठी श्रेयांक पद्धती व श्रेणी पद्धती चा उपयोग करता येऊ शकतो उत्तम वर्तन घडले असेल तर दृढीकरणाचा प्रयोग करणे अपेक्षित आहे आणि अनपेक्षित वर्तन गोले तर त्याकडे दुर्लक्ष न करता सुधारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
३.३ बर्याचदा अध्यापनानंतर शिक्षक अध्यापन निर्विवाद पूर्ण झाले आहे समज ठेवून असतात ,परंतु विद्यार्थ्याचे संपादन कमी असेल तर ते कार्यमान कमी का ? याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धती, अध्यापन कार्यनिती ,आपली पूर्वतयारी, विद्यार्थ्यांचे आकलन, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान ,आंतरक्रिया दरम्यान च्या बाबीं यामध्ये विद्यार्थ्याचे अवधान,आशय सुगमता काठिण्य स्तर आदीं सर्व बाबींची इत्यंभूत चिकित्सा करणे आवश्यक आहे जर शिक्षकाच्या अध्यापनात उणीव वा त्रुटि असेल तर त्यात सुधारणा व अभ्यासाने अव्वल प्रभुत्व प्राप्त करता येऊ शकते, थोडक्यात प्रत्येक अवस्थेमध्ये शिक्षकाची भूमिका ही सातत्याने बदलणारी असते व त्यामध्ये त्यासपूर्णतः अंतर्धान व्हावे लागते जेणेकरून त्या अवस्थेचा तो सर्वोच्च स्तरापर्यंत उपयोग करू शकेल.
उ. संदर्भ ग्रंथ
१. www.google.com
१.१ Jackson, P. (1967).Life in the classroom. 12.50pm Date:15/08/2014.
२. जगताप, ह.ना.(२००९). अध्ययन उपपत्ती व अध्यापन. पुणे. नित्य नूतन प्रकाशन.
Nice..
ReplyDelete