My poem
( प्रमाणित बियाण्याच्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर )
दुबार पेरणी
चला, चला, सकाळ झाली,
दुबार पेरणीची वेळ झाली....
सोयाबीन पेरून दिवस झाले तीन, चार,
पेरल्यालं उगवून येईल का ?
या विचारांने शेतकरी पडला होता गप्पगार....
अंतर्मन कुठेतरी सांगत होतं, "येड्या, "मी प्रमाणित बियाणे पेरलं आहे, "उगवलंच"म्हणतं होतं!
म्हणून विचारी बळीराजा एक, दोन नव्हे तर,
आणखी पाच, सहा, सात आणि आठ दिवस थांबला होता,
तोपर्यंत, मात्र प्रमाणित बियाण्यानं वांझोटेपणाचा कळस गाठला होता,
दम मातीत होता म्हणून तर गवतांच्या बियांनी अंकुर धरला होता,
खूप संशोधन करून, खत-पाणी देऊन, कीटकनाशकं लावून,
कंपनी विक्रमी उत्पादित, प्रमाणित सोयाबीन बियाण्यानं मात्र प्राण सोडला होता...
लगबगीने शेतात जाऊन काळी माती उकरून बघितली तर बियाणं मात्र सडलं होतं....
दुबार पेरणीच्या संकटानं मन मात्र घेरलं होतं.
तितक्यात काळ्या आईचा आवाज आला.... "बळीराजा, बळीराजा"....
डोळे पूस, "मागच्या वर्षीचे घरचं बियाणं आण, अन् धर मूठ"....
तशी स्वारी तडक घराकडे धावली....
आणि म्हणाली......
चला, चला सकाळ झाली,
दुबार पेरणीची वेळ झाली.....
कवि: अमोल चव्हाण


Comments
Post a Comment