सोशल मिडिया वापरताना हवी परिपक्वतेची जोड….
सोशल मिडिया वापरताना हवी परिपक्वतेची जोड…. सोशल मीडिया…… सर्वांच्याच अतिपरिचयाची बाब.... सर्वांनाच आपले म्हणणे मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ..... आपल्या जीवनात घडणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्याचे ठिकाण..... आणि इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी.... आजकाल सोशल मीडियावरून कुणाची तरी फसवणूक झाली किंवा कुणाला तरी लुबाडले अशा बातम्या बऱ्याचदा आपण बघतो किंवा वाचतो. सोशल मीडियावरून फसवणुकीच्या वेगवेगळ्या नवनवीन पद्धती आपणास पाहायला मिळतात. त्यातलीच एक बऱ्याचदा वाचायला मिळणारी बातमी म्हणजे सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एखादी व्यक्ती आपण परदेशात स्थायिक असून उच्च शिक्षित असल्याचा आव आणून परदेशात नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर काम करत आहे वगैरे थापा मारते. त्यात स्वतःचे खोटे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले असतात. असे संभाषण वाढत नेऊन थोडाफार विश्वास संपादन केला जातो आणि नंतर आपण एखादी महागडी भेटवस्तू म्हणून पाठवत आहे असे सांगितले जाते. काही दिवसांनी अचानक विमानतळावरील कस्टम अधिकारी बोलत...